अखेर त्या 'नकोशी'ची आई सापडली

अखेर त्या 'नकोशी'ची आई सापडली

  • Share this:

nakoshi01 मे : एकीकडे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे पण दुसरीकडे याच पुरोगामी महाराष्ट्रात समाजात आपली बदनामी होईल या भीतीने एका नवजात अर्भकाला फेकून देण्याची वेळ एका मातेवर आली. पण सुदैवाने या 'नकोशी' मातेचा आता शोध लागलाय. अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या या चिमुकलीला फेकून देण्याची कबुली या महिलेने दिली. विधवा असल्यामुळे बदनामीच्या भीतीने तिने हे कृत्य केलं. पोलिसांनी या मातेला ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल केलाय.

हिंगोली शहरात 5 दिवसांपूर्वी एनटीसी मिलच्या मैदानात कपड्यात गुंडाळलेलं एक नवजात स्त्री अर्भक सापडलं होतं. एनटीसी मिलच्या मैदानात सापडलेल्या या 'नकोशी'ला पोलिसांनी ताब्यात घेऊन उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं आणि गुन्हाही दाखल केला होता. त्या चिमुकलीच्या पायावर रुग्णालयाची शाई लावलेली आढळली.

त्यावरुन ही 'नकोशी' हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयातच जन्मल्याचं पोलिसांना समजलं. त्यावरुन पोलिसांनी मंगळवार ते शुक्रवार दरम्यान रुग्णालयात प्रसुत झालेल्या महिलांची यादी मागवली होती. त्यातील सर्व महिलांचा पत्ता सापडला एक महिला मात्र सापडत नव्हती. तिनं स्वत:चा पत्ता लिंबाळा गावचा दिला होता मात्र ती महादेववाडी परिसरात राहात होती. माहिती मिळताच पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.

अनैतिक संबंधातून बाळ जन्माला आल्यानं तिनं बाळ फेकून दिल्याची कबुली दिली आहे. विधवा असल्याने बदनामीच्या भीतीनं त्या महिलेनं बाळ फेकून दिल्याचं स्पष्ट झालंय. 'नकोशी'च्या आईविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2014 03:39 PM IST

ताज्या बातम्या