राखी भडकली, उमा म्हणजे पावसातला कीडा !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 30, 2014 06:41 PM IST

राखी भडकली, उमा म्हणजे पावसातला कीडा !

76rakhisawant_umabharti_30 एप्रिल : भाजपच्या नेत्या उमा भारतींनी राखी सावंतची तुलना काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधींशी केल्यामुळे राखी सावंत चांगलीच भडकलीय. उमा भारती माझी बहीण आहे. खूप चांगली बहीण आहे पण त्या पावसातल्या किड्या सारख्या आहेत जे कीडे ऐन पावसाळ्यातच बाहेर येतात असं सडेतोड प्रत्युत्तर राष्ट्रीय आम पार्टीची उमेदवार राखी सावंतने दिलं.

भाजपच्या 'फायरब्रँड' उमा भारतींनी आज एक वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. रॉबर्ट वडरा यांची पत्नी प्रियांका गांधी या राखी सावंत सारखं अर्थहीन बोलत राहते असं वादग्रस्त वक्तव्यउमा भारती यांनी केलं.तसंच रॉबर्ट वडरा यांची पत्नी माझ्यावर आरोप करते की, मी त्यांचं नाव घेऊन पब्लिसिटी स्टंट करते, त्यामुळे आता मी त्यांचं नाव घेणं बंद केलंय. आता मी त्यांचा उल्लेख रॉबर्ट वडराची पत्नी असाच करणार असंही भारती म्हणाल्या आणि प्रियांकांची तुलना राखी सावंतशी केली.

वारंवार आपली तुलना कोणत्याही नेत्यांबरोबर होत असल्यामुळे राखी यावेळी चांगलीच भडकली. उमा भारती आणि बाबा रामदेव यांनी भगव्या कपड्याला कलंक लावलाय अशी जळजळीत प्रतिक्रिया राखीने दिली. उमा भारती माझी बहीण आहे. खूप चांगली बहीण आहे पण त्या पावसातल्या किड्या सारख्या आहेत जे कीडे ऐन पावसाळ्यातच बाहेर येता असं प्रत्युत्तर राखीने आपल्या स्टाईलने दिलं. तसंच माझ्या विरोधात बोलू नका जर मी आखाड्यात उतरली तर सगळ्यांना भारी पडेल असा इशाराही राखीने दिला.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 30, 2014 06:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...