भारत विरूद्ध न्यूझीलंड चौथ्या दिवसाखेर भारतीय टीम विजयाच्या मार्गावर

6 एप्रिलवेलिंग्टन टेस्टमध्ये चौथ्या दिवसाखेर न्यूझीलंडनं चार विकेट गमावत 167 रन्स केलेत. झहीर खान आणि हरभजन सिंगच्या सुरेख बॉलिंगमुळे भारतीय टीम आता ऐतिहासिक विजयाच्या जवळ पोहोचली आहे. 613 रन्सचं अशक्यप्राय आव्हान समोर असताना न्यूझीलंडच्या पहिल्या चार विकेट्स शंभर रन्सच्या आत गेल्या आहेत. मॅकेनटॉश आणि गपटिल यांनी इनिंगची सावध सुरुवात केली खरी पण झहीरच्या एका सुरेख बॉलचं उत्तर मॅकेनटॉशकडे नव्हतं. स्लीपमध्ये द्रविडच्या हातात कॅच देऊन तो आऊट झाला आणि द्रविडचा हा टेस्टमधला 182वा कॅच ठरला. या कॅचबरोबरचं मार्क वॉचा सर्वाधिक कॅचचा रेकॉर्ड मोडीत काढत त्यानं एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड रचलाय. मॅकेनटॉश पाठोपाठ झहीरने फ्लिनलाही क्लीन बोल्ड केलं. तर हरभजन सिंगने मग गपटिल आणि धोकादायक जेसी रायडरला झटपट आऊट केलं आणि न्यूझीलंड टीम बॅकफूटवर गेली. त्यानंतर मात्र रॉस टेलर आणि जेम्स फ्रँकलिन यांनी हाफ सेंच्युरी पार्टनरशिप करत इनिंग सावरली. पण दिवसाच्या खेळाच्या 20 ओव्हर बाकी असताना अम्पायरनं बॅड लाइटच्या निर्णयानं दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. वेलिंग्टन टेस्टमध्ये भारतीय टीमची आगेकूच...न्यूझीलंडच्या चार विकेट्स, टेस्टमध्ये सर्वाधिक कॅच

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 6, 2009 08:20 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...