IPL स्पॉट प्रकरणावरील आदेश कोर्टाने ठेवला राखून

IPL स्पॉट प्रकरणावरील आदेश कोर्टाने ठेवला राखून

  • Share this:

supremecourt29 एप्रिल : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी सुप्रीम कोर्टाने चौकशी अहवालावरील आपला आदेश राखून ठेवला आहे. बीसीसीआयच्या चौकशी समितीला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली नव्हती.

त्यानंतर जस्टिस मुकुल मुदगल यांनी या प्रकरणाची पुढील चौकशी करण्याची तयारी दर्शवली होती. पण याला बीसीसीआयने विरोध केलाय. मुदगल समितीने पुढील चौकशी करण्यासाठी कोर्टाकडून 4 महिन्यांची मुदत मागून घेतलीये.

या चौकशीसाठी मुंबई आणि दिल्ली पोलिसांची मदत लागेल आणि सीबीआयचे स्पेशल डायरेक्टर एम. एल. शर्मा यांचीही मदत लागेल असं मुदगल समितीने कोर्टाला सांगितलंय. बीसीसीआयने याविरोधात अपील केलंय. त्याचबरोबर जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत श्रीनिवासन यांना अध्यक्षपदी कायम ठेवण्याची मागणीही बोर्डाने कोर्टाला केलीये. त्यामुळे कोर्टाने या प्रकरणाचे आदेश आता राखून ठेवले आहेत.

First published: April 29, 2014, 4:24 PM IST

ताज्या बातम्या