शिर्डीचा गुंड पाप्या शेख कोपरगाव पोलीस कोठडीतून फरार

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 29, 2014 03:50 PM IST

शिर्डीचा गुंड पाप्या शेख कोपरगाव पोलीस कोठडीतून फरार

papya29 एप्रिल :  शिर्डीचा कुख्यात गुंड पाप्या शेख यानं चार साथीदारांसह कोपरगाव पोलिस कोठडीतून फरार केलं आहे. शिर्डीतल्या रचित पाटणी आणि पप्पू गोंदका या दुहेरी खून प्रकरणी पाप्याला अटक करण्यात आली होती. त्या प्रकरणात कोपरगाव कोर्टात हजर करण्यासाठी त्याला नाशिक रोड जेलमधून आणण्यात आलं होतं.

मात्र रात्री पुन्हा नाशिकला नेण्याऐवजी कोपरगाव पोलिस स्टेशनच्या कोठडीतच ठेवण्यात आलं. या कोठडीचे गज वाकवून पाप्यानं विनोद जाधव, आबा लांबडे, सागर काळे आणि विकास चव्हाण यांनी पोलिसांच्या हातावर तुर्‍या देऊन पळ काढला. विशेष म्हणजे 2007 मध्ये कोपरगाव पोलिस कोठडीचे हेच गज वाकवून पाप्याचा गुंड मित्र संतोष वायकर यानंही पलायन केलं होतं.

दरम्यान पाप्या शेखसह इतर 7 कैदी पळून गेल्यानं पोलीस हैराण झाले असून पोलिसांनी नाकाबंदी केली आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 29, 2014 01:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...