तबल्याचा जादूगार अल्ला रक्खा खान यांची आज 95 वी जयंती

तबल्याचा जादूगार अल्ला रक्खा खान यांची आज 95 वी जयंती

  • Share this:

google doodle29 एप्रिल :  कुरैशी अल्ला रक्खा खान यांना तबल्याचा जादूगार अस म्हटल जात. आज त्यांची 95 वी जयंती आहे. त्यांना मानवंदना म्हणून आज गुगलने आपले विशेष डुडल बनवले आहे. गुगलने आपल्या गुगल- डुडलमध्ये दोन्ही 'O' मध्ये अल्ला रक्खा खान तबला वाजवताना दाखवला आहे.

कुरैशी अल्ला रक्खा खान यांचा जन्म 29 एप्रिल 1919 ला फगवाल,जम्मू इथ झाला होता. वयाच्या 12व्या वर्षापासून अल्ला रक्खा खाँ यांच तबल्याशी नात दृढ झाल होत.1940 ला ते मुंबई आकाशवाणीत रुजू झाले.त्यांचे शिष्य त्यांना अब्बाजी म्हणत.

अल्ला रक्खा खान यांना 1977 ला पद्मश्री पुरस्काराने तर 1982 ला संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल. 3 फेब्रुवारी 2000 रोजी मुंबईत त्यांच निधन झाल. त्यांच्या निधनानंतर तबल्याच एक युग संपल अस म्हणतात. पण त्यांच्या रेकॉर्ड केलेले अल्बम आणि संगीतरजनी यांच्यातून ते कायम जिवंत राहिलेत. जेव्हा जेव्हा पंजाब घराण्याची चर्चा होते तेव्हा उस्ताद अल्ला रक्खा खान यांच्या नावाची चर्चा होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 29, 2014 08:45 AM IST

ताज्या बातम्या