खंडणीसाठी 12 वर्षांच्या मुलाची तुकडे करुन हत्या

खंडणीसाठी 12 वर्षांच्या मुलाची तुकडे करुन हत्या

  • Share this:

rohan27 एप्रिल : कल्याणमध्ये १२ वर्षाच्या मुलाची ५० लाखांच्या खंडणीसाठी निर्घूणपणे हत्या करण्यात आली आहे. मुलाच्या कुटुंबाने खंडणी न दिल्याने अपहरणकर्त्यांनी मुलाच्या शरीराचे तुकडे करुन नाल्यात फेकले.

कल्याणमध्ये राहणार्‍या रोहन गुछेत या १२ वर्षाच्या मुलाचे १७ एप्रिलला अपहरण झालं होते. रोहनचे वडिल हे सोनार व्यावसायिक आहेत. अपहरणकर्त्यांनी रोहनच्या आईवडिलांना फोन करुन 50 लाखांच्या खंडणीची मगणी केली होती. मात्र गुछेत कुटुंबाने खंडणी दिली नव्हती. शनिवारी रात्री उशीरा रोहनचे शरीराचे तुकडे कृषी उत्पन्न बाजारपेठेतल्या नाल्यात आढळले.

या घटनेनंतर कल्याणमध्ये खळबळ माजली असून पोलिसांनी चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

 

First published: April 27, 2014, 1:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading