महाराष्ट्र तापला, विदर्भात पारा 40 च्या वर

महाराष्ट्र तापला, विदर्भात पारा 40 च्या वर

  • Share this:

summer-heat26 एप्रिल : एप्रिल महिना आता संपण्यावर आला पण सूर्याची दाहकता वाढल्यामुळे विदर्भाच्या बहुतांश भागातील लोक उकाड्याने त्रस्त झाले आहेत. विदर्भात उन्हाचा पारा 40 च्यावर पोहचला आहे. त्यामुळे प्रचंड उकाड्यामुळे लोका हैराण झाले आहे. मुंबईतही उन्हाचा पारा 37 वर पोहचलाय.

उन्हाचा पारा वाढल्यामुळे दुपारी रस्ते ओस पडले आहे. लोक उन्हापासून आणि उकाड्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी विविध उपाय करत आहेत. उसाचा रस, ज्यूस घेण्याकडेही लोकांचा कल आहे तर कामनिमित्त -शाळा महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी रुमाल आणि गॉगल्स लावूनच घराबाहेर पडत आहेत.

या आठवड्यात विदर्भाच्या काही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. बंगालच्या उपसागरावरून बाष्प येत असल्याने आकाशात ढग जमा होत असून त्यामुळे काही ठिकाणी पाऊस पडल्याचे हवामान खात्याने संागितले आहे. हवामानाची आताची स्थिती पाहता हे वातावरण आणखी चार ते पाच दिवस असेच राहणार असल्याचही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

First published: April 26, 2014, 1:44 PM IST

ताज्या बातम्या