टी - 20 वर्ल्डकपसाठी भारताची संभाव्य टीम जाहीर

4 एप्रिल आयपीएल जरी भारताबाहेर गेले असले तरी येत्या जूनमध्ये होणार्‍या टी - 20 वर्ल्डकपची तयारी भारतात सुरु झाली आहे. इंग्लंडमध्ये होणार्‍या या टी - 20 वर्ल्ड कपसाठी भारताच्या संभाव्य टीमची घोषणा आज करण्यात आली आहे. 2007 मधला पहिला वर्ल्डकप खेळलेल्या सगळ्या खेळाडूंचा या यादीत समावेश आहे. तसंच वृद्धमान साहा, अजिंक्य रहाणे, आर अश्विन आणि धवल कुलकर्णी यांनाही संभाव्य टीममध्ये जागा मिळाली असून या मॅचेसमधे आर. पी. सिंग, लक्ष्मीपती बालाजी यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. एस. श्रीसंत दुखापतीमुळे वर्ल्डकपमध्ये खेळू शकणार नसल्याची शक्यता आहे तर खराब फॉर्ममुळे हरयाणाच्या जोगिंदर शर्माचा या मॅचसाठी विचारंच करण्यात आला नाही. पुढच्या आठवड्यात सुरु होणार्‍या आयपीएल दरम्यान या खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यात येणार असून आयपीएल नंतर पंधरा जणांची अंतिम निवड करण्यात येणार असल्याची चर्चा सध्या क्रिडावर्तुळात सुरू आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Apr 4, 2009 09:41 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2009 09:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...