राज्यात आजपासून तीन दिवस लोडशेडिंग

Samruddha Bhambure | Updated On: Apr 25, 2014 03:18 PM IST

Image img_226072_electrisity4_240x180.jpg25  एप्रिल :  राज्यातील काही भागात आजपासून तीन दिवस लोडशेडिंग होणार आहे. अकोला ते औरंगाबाद या उच्चदाब वाहिनीची दुरूस्ती करण्यात येणार असल्याने शुक्रवार ते रविवारदरम्यान राज्यातील वीजपुरवठा विस्कळीत होणार आहे. औरंगाबाद,जालना,पुणे,कोल्हापूर,अहमदनगर,बारामती,सोलापूर,नवीमुंबई व ठाणे या भागात लोडशेडिंग होणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केलं आहे.

केंद्र सरकारचे पॉवर ग्रीड आणि राज्यातील महापारेषण कंपनीतर्फे 400 किलोव्होल्ट वाहिनीचे काम केले जाणार आहे. राज्यात विजेची निर्मिती पूर्व भागात होते. तर विजेची सर्वाधिक मागणी ही मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रातून होत आहे. या वाहिनीवरून सध्या एक हजार मेगावॉट विजेचे वहन होते. या दुरूस्तीच्या कामानंतर या वाहिनीची क्षमता 2 हजार मेगावॅटपर्यंत वाढणार आहे.

या दुरूस्तीसाठी किमान 8 दिवस लागणार होते. मात्र ऐन उन्हाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी हे काम 3 दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. आज संध्याकाळी 4 वाजता हे दुरूस्तीचं काम सुरू होणार असून रविवारी संध्याकाळी 6 पर्यंत हे काम चालणार आहे. ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2014 12:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close