25 एप्रिल : यंदा सरासरीपेक्षा ९५ टक्केच पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवला आहे. पॅसिफिक महासागरातल्या एल-निनो च्या प्रभावामुळे मान्सूनवर परिणाम असं हवामान खात्याने म्हटलं.
सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता तब्बल ३३ टक्के तर अत्यंत कमी पावसाची शक्यता २३ टक्के वर्तवली गेली आहे. तर आयएमडीच्या अंदाजानूसार सरासरी एवढा पाऊस पडण्याची शक्यता ३५ टक्के आहे.
याउलट सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता फक्त ९ टक्के वर्तवली गेली आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभागाच्या सांगण्यानुसार यंदाचा पावसाळ अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे.
कमी पाऊस पडण्याची ही चार वर्षातली पहिलीच वेळ असेल. गेली 4 वर्षं देशात चांगल्या पावसामुळं उत्तम पीक आलं होतं. पण यावर्षी गारपिटीनंतर कमी पावसाचं संकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे.
Follow @ibnlokmattv |