3 एप्रिल, वेलिंग्टनवेलिंग्टन टेस्टच्या पहिल्या दिवशी भारतीय टीमने 375 रन्सची मजल मारलीय. पण त्यासाठी नऊ विकेट्स गमावल्यात. भारताचे मिडल ऑर्डर बॅट्समन बेजबाबदार शॉट्स खेळून आऊट झाले. सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंग धोणी यांनी हाफ सेंच्युरी केली खरी, पण मोठा स्कोअर काही ते करू शकले नाहीत. तेंडुलकर 62 तर धोणी 50 रन्सवर आऊट झाले. विरेंद्र सेहवाग, राहुल द्रविडही चांगला जम बसलेला असताना खराब शॉट खेळून आऊट झाले. परिणामी भारताची निम्मी टीम दोनशे रन्सच्या आतच आऊट झाली होती. पण धोणी आणि हरभजन सिंगने 79 रन्सची पार्टनरशिप करत इनिंगला आकार दिला. त्यातही हरभजन सिंगने आक्रमक 60 रन्स केले. तळाच्या बॅट्समनना हाताशी धरत त्याने टीमला साडे तीनशे रन्सचा टप्पा गाठून दिला. आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुनाफ पटेल 14 तर ईशांत शर्मा 13 रन्स करुन खेळत होते. न्यूझीलंडतर्फे ख्रिस मार्टिने तीन तर साऊदी आणि ओब्रायन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा