अनफिट धोणी टेस्ट खेळणार का ?

अनफिट धोणी टेस्ट खेळणार का ?

2 एप्रिल इंडियन कॅप्टन महेंद्र सिंग धोणीच्या टेस्ट खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानची तिसरी आणि शेवटची टेस्ट मॅच उद्यापासून वेलिंग्टनला सुरू होत आहे. पण इंडियन कॅप्टन महेंद्र सिंग धोणीच्या फिटनेसबाबतची अनिश्चितता अजूनही कायम आहे. त्यामुळे तो उद्याच्या टेस्टमध्ये खेळेल किंवा नाही हे अजून ठरलेलं नाही. धोणीला गेल्या काही दिवसांपासून पाठदुखीचा त्रास जाणवत आहे. या त्रासामुळेच तो नेपिअरमध्ये झालेल्या दुसर्‍या टेस्टमध्ये खेळू शकला नव्हता. धोणीच्या अनुपस्थितीत विरेंद्र सेहवागने कप्तानी सांभाळली. तर दिनेश कार्तिकने विकेट कीपिंग केलं. काल धोणीची फिटनेस टेस्ट घेण्यात आली. पण त्यानंतरही त्याच्या खेळण्यावर अंतिम निर्णय झाला नाही. भारतीय टीम या सीरिजमध्ये एक शून्यने आघाडीवर आहे. आणि उद्याची टेस्ट भारताने जिंकली किंवा ड्रॉ झाली तर सीरिज जिंकण्याची संधी भारताला आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 2, 2009 12:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...