2 एप्रिल शिर्डीतून रामदास आठवले चार एप्रिलला काँग्रेसच्या उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत. काँग्रेसने रामदास आठवले यांना तसं अधिकृत पांठिंब्याचं पत्र पाठवलं आहे. त्यामुळे शिर्डीच्या उमेदवारीचा घोळ आता सुटला आहे. काँग्रेसचा आठवलेंना शिर्डी मतदार संघातून उमेदावारी देण्याचा निर्णय झाला असला तरी त्याबाबत अधिकृत घोषणा झाली नव्हती. त्यामुळे नाराज झालेल्या रामदास आठवलेंनी आता शिर्डीतून उमेदवारी अर्ज भरणार नाही असा इशारा दिला होता. दोन्ही पक्षांनी आधी आपल्या उमेदवारीची घोषणा करावी मगच आपण उमेदवारी अर्ज दाखल करू असंही आठवले म्हणाले होते. मात्र आता काँग्रसने आठवलेंना अधिकृत उमेदवारीचं पत्र पाठवून त्यांची नाराजी दूर केली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा