पुणेकरांची 'पाणीबाणी' दिवाळीपूर्वीच सुरू; 5 तासच होणार पाणीपुरवठा

पुणेकरांची 'पाणीबाणी' दिवाळीपूर्वीच सुरू; 5 तासच होणार पाणीपुरवठा

पुण्यात २९ ऑक्टोबरपासूनच पाणीपुरवठ्यात कपात करण्यात येणार आहे. शहरात एकाच वेळी पाणीपुरवठा केला जाईल. त्यातली एका वेळी ५ तास पाणीपुरवठा होईल.

  • Share this:

अद्वैत मेहता, प्रतिनिधी

पुणे 23 ऑक्टोबर : सर्वांना समान पाणीपुरवठा व्हावा यासाठी नियोजन करत असल्याचं सांगत पुण्यात २९ ऑक्टोबरपासूनच पाणीपुरवठ्यात कपात करण्यात येणार आहे. शहरात एकाच वेळी पाणीपुरवठा केला जाईल. त्यातली एका वेळी ५ तास पाणीपुरवठा होईल.

महापौर मुक्ता टिळक यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, ही पाणीकपात नाही, तर समान फेरवाटप आहे. पण दिवाळीपूर्वीच ही पाणीकपातीचं संकट ओढवल्यानं पुणेकरांची दिवाळी चिंतेत जाण्याची चिन्हं आहेत.

आज महापौरांनी पाण्याच्या पुरवठ्याच्या नियोजनासाठी महत्त्वपूर्ण बैठक बोलवली होती. त्यात हा निर्णय झालाय. सुरुवातीला दिवाळीनंतर पाणीकपात होणार असल्याचे संकेत देण्यात आले. पण संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महापौरांनीच पाणीकपात याच महिन्यापासून सुरू होणार असल्याचं स्पष्ट केलं.

शहराला पाणी पुरवठा कराणाऱ्या खडकवासला आणि पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणात गेल्या वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा असल्याने पुण्याला यंदा पाण्याची टंचाई जाणवणार हे निश्चित आहे.

पाणी पुरवठा कसा करायचा याचे वेळापत्रक तयार करण्यात आलं असून  पक्षनेते आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांच्या बैठकीत सहमती झाली की 2 दिवसात हे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.

दरम्यान, काहीही झालं तरी दिवाळीत पाणी कपात होऊ देणार नाही, अशी घोषणा राज्याचे अन्नपुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केली होती. त्यामुळे पुण्याच्या पाणीकपातीच्या मुद्द्यावर सरकार स्वतःच निर्माण केलेल्या कोंडीत सापडलंय.

ऑक्टोबर महिन्यातील पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत आहे. राज्यातील टँकरच्या संख्येने आताच ४०० चा टप्पा ओलांडला असून आता पर्यत तब्बल ४२५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. तर राज्यातील पाणीसाठय़ाचं प्रमाण ६१.९६ टक्क्यांपर्यंत खाली आलं असून मागच्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांनी  हा पाणीसाठा कमी आहे.

VIDEO : विमानात उस्फूर्त नृत्य करून एअर होस्टेसनी दिला प्रवाशांना सुखद धक्का

First published: October 23, 2018, 6:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading