भारताला मिळाला दुसरा सेहवाग! ‘या’ खेळाडूच्या निडर खेळीनंतर दिग्गजांनीही केलं मान्य

भारताला मिळाला दुसरा सेहवाग! ‘या’ खेळाडूच्या निडर खेळीनंतर दिग्गजांनीही केलं मान्य

पहिल्यांदाच सलामीला उतरलेल्या भारताच्या दोन्ही खेळाडूंची विक्रमी कामगिरी केली.

  • Share this:

विशाखापट्टणम, 07 ऑक्टोबर : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं 203 धावांनी विजय मिळवला. यात पहिल्या डावात रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल यांनी विक्रमी भागिदारी केली. पहिल्यांदाच सलामीला उतरलेल्या या दोन्ही खेळाडूंची विक्रमी खेळीनं भारतानं पहिल्या डावापासून विजयाकडे आगेकुच करण्यास सुरुवात केली.

पहिल्या डावात सलामीचा फलंदाज मयंक अग्रवालनं दक्षिण आफ्रिका विरोधात दुहेरी शतक लगावले. मयंकनं कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच शतक लगावले, आणि पुढील काही चेंडूत शतकाचे रुपांतर दुहेरी शतकात केले. पहिल्या डावात मयंकनं 215 धावांची तुफानी खेळी केली.

मयंकच्या या आक्रमक खेळीवर व्हीव्हीएस लक्ष्मणची ओळख आता दुसरा सेहवाग अशी केली आहे. लक्ष्मणनं, “मयंक ताकदवान खेळाडू आहे. घरेलु क्रिकेटमध्ये त्यानं ज्या प्रकारची कामगिरी केली आहे, त्यावरून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे सोपे गेले. स्थिर फलंदाजी आणि चांगली मानसिकता हे त्याचे चांगले गुण आहेत. त्यामुळं तो निडर होऊन सेहवागसारखी खेळी करतो”, असे मत व्यक्त केले.

वाचा-बापच म्हणाला, इंजिनिअरिंग सोड क्रिकेट खेळ! या वाक्यानं बदललं क्रिकेटपटूचं आयुष्य

लक्ष्मणनं हे मत मयंकच्या खेळी दरम्यान समालोचन करताना केले. तर, याचवेळी हरभजन सिंगनं, “जेव्हा मयंक क्रिझच्या बाहेर येऊन पायाचा वापर करून शॉट खेळतो, तेव्हा त्याला पाहण्याची मजा वेगळी असते. तो शानदार पध्दतीनं रिव्हर्स स्विपही लगावतो. जेव्हा गरज आहे तेव्हा आक्रमक आणि इतर वेळी स्ट्राईक बदलण्याचं काम करतो. मयंक एक मेहनती खेळाडू आहे. असे खेळाडू घरेलु क्रिकेटमधून येतात”, असे सांगत मयंकचे कौतुक केले.

वाचा-रोहित शर्माच्या वक्तव्यानं ऋषभ पंतचे करिअर धोक्यात, म्हणाला...

मयंकला संघातून वगळण्याचाही केला होता विचार

भारताचा माजी सलामीवीर रॉबिन उथप्पाने मयंक अग्रवालबद्दल बोलताना सांगितलं की, जर कर्नाटकचे माजी कर्णधार आर विनय कुमार यांनी मयंकला वेळीच सल्ला दिला नसता तर आज क्रिकेटला असा फलंदाज बघायला मिळाला नसता. मयंकने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विशतकी खेळी करून भारताला मजबूत स्थितीत पोहोचवलं आहे. मयंक अग्रवाल जेव्हा कर्नाटककडून खेळत होता तेव्हा संघातून बाहेर पडण्याची वेळ त्याच्यावर आली होती. त्यावेळी रॉबिन उथप्पा त्याचा सहकारी खेळाडू होता. उथप्पाने सांगितलं की कशाप्रकारे मयंकला आर विनय कुमार यांनी प्रेरणा दिली आणि त्यानंतर मयंकच्या फलंदाजीत सुधारणा झाली. उथप्पाने कोलकाता नाइट रायडर्सच्या एका कार्यक्रमावेळी सांगितलं की, मला आठवतं त्यावेळी मयंकला रणजी सामन्यातून वगळण्यावर विचार करत होतो.

वाचा-विमान नाही, पक्षी नाही; हा तर निघाला सर जडेजा! अफलातून कॅचचा VIDEO

VIDEO : अंगावर रोमांच उभी करणारी तलवारबाजीची थरारक प्रात्याक्षिकं

Published by: Priyanka Gawde
First published: October 7, 2019, 5:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading