महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 123वी जयंती

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 123वी जयंती

  • Share this:

babasaheb ambedkar13 एप्रिल :  आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 123 वी जयंती आहे. त्यानिमीत्ताने आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने दादरमधल्या चैत्यभूमीवर आणि नागपूरमधल्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. बाबासाहेबांनी दिलेला शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र आजची तरूण पिढीही विसरलेली नाहीय. त्यामुळे ही तरूण पिढी बाबासाहेबांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करायला येते.

सध्या निवडणुकांचं वातावरण असल्यामुळे अनेक उमेदवारांनी देखील चैत्यभूमीवर हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. मुंबईच्या चैत्यभूमीप्रमाणेच नागपूरच्या दीक्षाभूमीवरही दरवर्षी भीमसागर उसळतो. याही वेळेस बाबासाहेबांच्या अनुयायांनी गर्दी केली आहे..

भारतीय घटनेचे शिल्पकार आणि दलितांचे कैवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 123 वी जयंती. आंबेडकर यांचा जन्म 1891 साली मध्य प्रदेशमधल्या महूमध्ये झाला. अतिशय गरीब कुटुंबात जन्म होऊनही आंबेडकरांनी मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर लंडन आणि कोलंबिया विद्यापीठांमधून शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी लंडन स्कुल ऑफ इकोनॉमीमधून डॉक्टरेटची पदवी मिळवली.

आंबेडकरांनी अस्पृश्यतेच्या विरोधात लढा देऊन दलित समाजाला अस्पृश्यतेतून मुक्त केलं. आणि समाजात सन्मानाने जगण्याचा, वावरण्याचा हक्क मिळवून दिला. "शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा", असा संदेश बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना दिला. आपल्या 65 वर्षाच्या आयुष्यात इतकं व्यापक आणि समाजाला कित्येक पटींनी सुधरवणारं काम करणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आयबीएन लोकमतची आदरांजली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 14, 2014 10:19 AM IST

ताज्या बातम्या