मध्यरेल्वेची वाहतूक 25-30 मि. उशीराने

  • Share this:

Image img_90292_mumbai_local_240x180.jpg13 एप्रिल :  भामध्य रेल्वेच्या सीएसटीकडे जाणार्‍या स्लो लोकलमध्ये डोंबिवली- कोपर स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्या मध्य रेल्वेच्या सीएसटीकडे जाणार्‍या सर्व लोकल 25-30 मि. उशीराने धावत आहेत. काही वेळासाठी स्लो लोकल कोपर आणि दिवा येथे न थांबवता पुढे नेण्यात येत आहेत.

स्लो ट्रेन्सचा एकमेव पर्याय असलेल्या कोपर , दिवा, मुंब्रा आणि कळवा दरम्यान कोणतीही लोकल न थांबल्याने प्रवाशांत संताप व्यक्त केला जात आहे. आज आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने सरकारी कामकाज बंद आहे, त्यामुळे लोकलला फार गर्दी जरी नसली तरी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक सकाळीच कोलमडल्याने चाकरमान्य त्रस्त झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 14, 2014 08:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading