ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ताजी ताम्हाणे यांचे निधन

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ताजी ताम्हाणे यांचे निधन

  • Share this:

Dattaji tamhane07 एप्रिल :  ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि विचारवंत दत्ताजी ताम्हाणे यांचं आजसकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 101 वर्षांचे होते. मुंबईमधल्या मुलुंडच्या साईधन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

आपले आयुष्य देशसेवेला वाहण्याचा निर्णय घेत ताम्हाणे 1928 मध्ये सायमन कमिशनच्या बहिष्काराच्या निमित्ताने स्वातंत्रलढ्यात सहभागी झाले. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात ताम्हाणे यांनी तुरुंगवासही भोगला. ताम्हाणे यांनी जंगल कामगारांच्या हक्कासाठी लढा दिला. ताम्हाणे हे माजी आमदारही होते, तसेच गोवा मुक्ती संग्रामातल्या सहभागबरोबरच ते समाजवादी चळवळीतही सक्रीय होते.

ताम्हाणे यांनी 100व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर त्यांचा राज्य सरकारनं त्यांचा विशेष सत्कार केला होता. दत्ताजींचा जन्म 13 एप्रिल 1913 रोजी रत्नागिरी इथं झाला होता. 100 वय असलं तरी ते मुलुंडमधल्या सामाजिक कार्यक्रमात ते उत्साहानं सहभागी व्हायचे. 1968 मध्ये ते विधान परिषदेवर निवडून आले. सत्याग्रह, आंदोलने, चळवळी, राजकारण, समाजकारण असे त्यांचे जीवन होते.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री गणेश नाईक आणि वसंत डावखरे यांनी अंत्यदर्शन घेतले. आज दुपारी 12.30 वाजता मुलुंडमध्ये ताम्हणे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.

First published: April 7, 2014, 11:08 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading