गारपीटग्रस्तांसाठी केंद्राचे तात्पुरते 352 कोटींचे पॅकेज

गारपीटग्रस्तांसाठी केंद्राचे तात्पुरते 352 कोटींचे पॅकेज

  • Share this:

Untimely rain, hailstorm damaged in Maharashtra

केंद्राचे तात्पुरते 352 कोटींचे पॅकेज

31 मार्च : अस्मानी संकटाने हैराण झालेल्या बळीराजाच्या मदतीला अखेर केंद्र सरकार धावून आले आहे. गारपीटग्रस्त फळबागधारक शेतकर्‍यांसाठी 352 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय आज(सोमवारी) मंत्रिगटाच्या बैठकीत घेण्यात आला. ही केंद्राची तात्पुरती मदत आहे.

अंतिम मदत नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर देण्यात येईल असं सांगण्यात आलंय. सध्या, द्राक्षं, केळी, संत्रा, आंबा, डाळिंब, पपई आणि काजू या फळांसाठी ही तातडीची मदत देण्यात येणार आहे.

केळीबागांसाठी दर 4 हेक्टरला 50 हजार रुपये, डाळिंबासाठी 30 हजार , संत्र्यासाठी 30 हजार, पपई 35 हजार आणि काजू उत्पादकांसाठी 20 हजारांची मदत जाहीर करण्यात आलीय. या अगोदर राज्य सरकारने 5 हजार कोटींची मदत जाहीर केलीय.

गारपीटग्रस्तांना केंद्राची मदत

  • नुकसान झालेल्या केळीबागांसाठी दर 4 हेक्टरला 50 हजार
  • डाळिंबासाठी 30 हजार
  • संत्र्यासाठी 30 हजार
  • पपई 35 हजार
  • काजू 20 हजार
  • फळबागांची पुर्नलागवड करण्यासाठी दर दोन हेक्टरसाठी संत्र्याला 20 हजार
  • द्राक्षासाठी 20 हजार
  • आंबा 2 हजार रुपयांची मदत

First published: March 31, 2014, 3:35 PM IST

ताज्या बातम्या