मुंबई, 06 ऑक्टोबर : सध्या टीव्हीवर रिअलिटी शोची चलता आहे. मागच्या काही दिवसांपासून लोकप्रिय रिअलिटी शो 'कौन बनेगा करोडपती'चा टीआरपी वाढताना दिसत आहे. अमिताभ बच्चन यांच्या या क्विज शोला प्रेक्षकांची खूपच पसंती मिळत आहे. या शोमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांसोबतच या शोमधील स्पर्धकही खूप चर्चेत राहतात. सर्वच स्पर्धकांशी अमिताभ बच्चन खूप गप्पा मारतात. मात्र काही स्पर्धक असे असतात जे आपल्या प्रश्नांनी अमिताभ यांची बोलतीच बंद करतात. असच काहीसं नुकतंच प्रसारित झालेल्या KBC च्या एपिसोडमध्ये पाहायला मिळालं.
4 ऑक्टोबरला प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये हरियाणाच्या डॉक्टर उर्मिला धरतवाल यांनी हजेरी लावली होती. त्या फास्टेस्ट फिंगर फर्स्ट पार करुन हॉट सीट पर्यंत पोहोचल्या होत्या. त्या जशा केबीसीच्या मंचावर पोहोचल्या तसा त्यांच्या गप्पांचा भडिमार सुरू झाला. सर्वात आधी त्यांनी उपस्थित प्रेक्षकांना खूप सारे फ्लाइंग किस दिले. जे पाहून खुद्द अमिताभ बच्चन सुद्धा अवाक झाले.
रॅप साँगवर अमिताभ बच्चन यांनी केला डान्स, रणवीर सिंह म्हणतो...
उर्मिला अमिताभ यांना म्हणाल्या, मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो की, तुम्हाला तुम्हाला तुमच्या आईनं काय खाऊन जन्माला घातलं होतं? ज्यामुळे सर्वच बाबतीत तुम्ही एवढे उत्कृष्ट आहात. उर्मिला यांचा हा प्रश्न ऐकल्यावर अमिताभ यांच्यासोबत तिथं उपस्थित असलेले प्रेक्षकही हैराण झाले. अमिताभ तर हा प्रश्न ऐकल्यावर काही मिनिटं गप्पच झाले आणि नंतर म्हणाले, तुम्ही हा प्रश्न का विचारत आहात.
मात्र नंतर उर्मिला यांच्या प्रश्नाचं उत्तर देताना अमिताभ म्हणाले, 'देवीजी, माझी आई तर आता हयात नाही. तसेच तिनं कधी हे सुद्धा सांगितलं नव्हतं की मी हे खाल्लं त्यानंतर तुझा जन्म झाला. अशाप्रकारच्या गोष्टी कोण बोलत आपल्या मुलांसोबत. जेव्हा एखाद्या व्यक्तीला अपशब्द वापरायचे असतात तेव्हा असं विचारतात की, काय खाऊन तुझ्या आईनं तुला जन्माला घातलं होतं.' हे ऐकल्यावर उर्मिला लगेच म्हणाल्या, 'तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहात.'
जावेद अख्तरांसोबत 55 वर्षांपूर्वी काय घडलं होतं? शबाना आझमींनी शेअर केली पोस्ट
19 वर्षांपासून करत होत्या प्रयत्न
उर्मिला यांच्या मोकळ्या आणि विनोदी स्वभावं सर्वांनाच इम्प्रेस केलं. तर अमिताभ बच्चन सुद्धा उर्मिला यांना भेटून खूप खूश झालेले दिसले. उर्मिला यांनी सांगितलं की त्या मागच्या 19 वर्षांपासून म्हणजेच 2000 सालापासून 'कौन बनेगा करोडपती'मध्ये संधी मिळण्यासाठी प्रयत्न करत होत्या. 19 वर्षांच्या त्यांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांना हॉटसीटवर बसण्याची संधी अखेर या सीझनमध्ये मिळाली.
अभिनेत्रीला बॉयफ्रेंडनं ठेवलं होतं बाथरुमध्ये कोंडून, Bigg Bossमध्ये केला खुलासा
=========================================================
VIDEO : अंग गोठवणाऱ्या थंडीत वर्षभर राहणाऱ्या नवदुर्गेचा अनुभव