अखेर श्रीनिवासन 'आऊट', गावसकर आयपीएलपुरते अध्यक्ष !

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Mar 28, 2014 05:29 PM IST

अखेर श्रीनिवासन 'आऊट', गावसकर आयपीएलपुरते अध्यक्ष !

M_Id_414931_N_Srinivasan28 मार्च : स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे सध्या वादात सापडलेल्या 'आयपीएल'मॅचला काल दिलेल्या दणक्यानंतर आज सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयला दिलासा दिला आहे. आयपीएलचा सातव्या हंगामातले सामने हे ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे होणार,  असे सुप्रीम कोर्टाने आज आज ( शुक्रवारी ) सांगितले.

आयपीएलच्या या सीझनपुरते म्हणजे 16 एप्रिल ते 1 जून दरम्यान सुनील गावसकर हे बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष असतील असे आदेश आज सुप्रीम कोर्टानं आज दिले आहेत. तर आयपीएलच्या या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या टीम्सना खेळण्यास सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दाखवला आहे.

या वरुन आता एक गोष्ट स्पष्ट झालीये की एन. श्रीनिवासन यांना आपलं पद सोडावं लागणार आहे. यानंतर ते बीसीसीआयचे अध्यक्ष नसतील.

आयपीएल व्यतिरीक्त होणारे कारभार बीसीसीआयचे उपाध्यक्ष शिवलाल यादव सांभाळतील असंही कोर्टाने स्पष्ट केले आहे. तर गावसकर आयपीएल दरम्यान कॉमेंट्री करु शकणार नाहीत म्हणून बोर्डाशी असलेला कॉमेंट्रीचा करार संपवण्याचे आदेशही कोर्टाने दिलेे आहेच.

या आयपीएलदरम्यान बोर्डाने गावसकर यांना मानधन द्यावं असंही कोर्टानं जाहिर केलं आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी 16 एप्रिलला होणार असून बीसीसीआयनं कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केले आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 28, 2014 11:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...