25 मार्च : सिंधुदुर्गातला काँग्रेस आणि राष्ट्रवादीतला तिढा आजही कायम आहे. राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा नारायण राणेंच्या विरोधात जोरदार आक्षेप नोंदवला आहे आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. तर राज्यातही राष्ट्रवादीच्या 21 जागा आहेत त्याबाबतीत मला काँग्रेस श्रेष्ठींशी बोलावं लागेल असा उलट इशारा नारायण राणेंनी दिला आहे.
राष्ट्रवादीचे संपर्क प्रमुख आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामत यांच्या उपस्थितीत सावंतवाडीत बैठक झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी सामंत यांनी आघाडीच्या उमेदवाराला निवडून देण्याचे पक्षाकडून आणलेले आदेशही नाकारले.
यासंबंधात कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असल्याचं मान्य करत याबाबतीत पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील असं सामंत यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.