S M L

'श्रीनिवासन अध्यक्षपद सोडा'!

Samruddha Bhambure | Updated On: Mar 25, 2014 04:55 PM IST

'श्रीनिवासन अध्यक्षपद सोडा'!

M_Id_414931_N_Srinivasan25 मार्च :  'इंडियन प्रीमिअर लीग' ( आयपीएल ) फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना जोरदार दणका बसला आहे. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं बीसीसीआय अध्यक्ष एन श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावं असं मत नोंदवलं आहे. 'जोपर्यंत श्रीनिवासन अध्यक्षपदावर कायम आहेत या प्रकरणी निष्पक्षपणे चौकशी होऊ शकत नाही' असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. इतकचं नाही तर आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणं हे अत्यंत गंभीर असल्याचे ताशेरेही सुप्रीम कोर्टानं ओढले आहे.

'मुदगल समितीच्या अहवालामध्ये अत्यंत गंभीर आणि संवेदनशील आरोप आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी श्रीनिवासन असेपर्यंत या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी होऊ शकत नाही,' असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. श्रीनिवासन पायउतार होत नाहीत, तोपर्यंत तुमचा (बीसीसीआय) कुठलाही युक्तीवाद ऐकणार नाही, असेही न्यायालयाने सुनावले. 'क्रिकेट स्वच्छ ठेवायचे असेल, तर श्रीनिवासन यांनी पद सोडायला हवे. ते पदाला चिकटून बसणार असतील, तर आम्ही आदेश काढू,' असा इशारा न्यायालयाने दिला.

सुप्रीम कोर्टाच्या या टिप्पणीनंतर बीसीसीआय आणि श्रीनिवासन यांनी प्रतिक्रीया देणं टाळलंय.त्यामुळे आता बोर्ड काय निर्णय घेतयं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. श्रीनिवासन आणि बीसीसीआयला विचार कळून मत कळवण्यासाठी कोर्टानं 3 दिवसांचा अवधी दिला आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी 27 मार्चला म्हणजेच गुरुवारी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 25, 2014 12:22 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close