शक्ती मिल गँगरेप प्रकरणी शिक्षा सुनावणार?

शक्ती मिल गँगरेप प्रकरणी शिक्षा सुनावणार?

  • Share this:

shakti mill25 मार्च :  शक्ती मिलमधल्या फोटोजर्नलिस्ट गँगरेप प्रकरणी आज शिक्षा सुनावली जाणार आहे. कोर्टाने आरोपींविरोधात नव्यानं आरोप निश्चित केले आहेत.

याआधी शुक्रवारी टेलिफोन ऑपरेटरवरच्या गँगरेप प्रकरणात 4 आरोपींना जन्मठेप सुनावण्यात आली होती. त्यापैकी तीन आरोपींना फोटोजर्नलिस्ट बलात्कार प्रकरणीही दोषी ठरवण्यात आलं आहे.

जुलै आणि ऑगस्ट 2013 मध्ये शक्ती मिल कम्पाऊंडमध्ये झालेल्या दोन गँगरेप प्रकरणी एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यापैकी विजय जाधव, मोहम्मद कासिम हाफिज शेख आणि मोहम्मद अन्सारी यांना दोन्ही प्रकरणात दोषी ठरवण्यात आल आहे. त्यामुळे त्यांना सराईत गुन्हेगार मानावं, अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली आहे.

या दोन्ही प्रकरणातल्या दोन अल्पवयीन आरोपींचा खटला ज्युवेनाईल कोर्टात सुरू आहे.

First published: March 25, 2014, 10:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading