तारा निखळला, कुलदीप पवार काळाच्या पडद्याआड

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 24, 2014 11:30 PM IST

तारा निखळला, कुलदीप पवार काळाच्या पडद्याआड

kuldeep pawar24 मार्च : विनोदी अभिनय, त्याच तोडीचा खलनायक आणि आकर्षक व्यक्तिमत्व अशा अष्टपैलू कलाकाराने चटका लावणारी एक्झीट घेतलीय. ज्येष्ठ अभिनेते कुलदीप पवार यांचं निधन झालंय. गेल्या काही दिवसांपासून त्यांना मूत्रपिंडाचा त्रास होता.

मागिल आठवड्यात शनिवारी प्रकृतीअस्वस्थामुळे त्यांना मुंबईत अंधेरी येथील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान आज सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या कोल्हापुरात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. एक हरहुन्नरी अभिनेता काळाच्या पडद्याआड गेल्यानं मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरलीय.

कुलदीप पवार... त्यांचा खलनायक जितका प्रभावी, तितकाच हिरो...भारदस्त आवाज आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व याच जोरावर त्यांची भूमिका नेहमीच लक्षात राहायची.

कामाच्या शोधात असतानाच प्रभाकर पणशीकर यांना कुलदीप पवार यांच्यात संभाजी दिसला आणि इथे 'ओशाळला मृत्यू' नाटकात त्यांना भूमिका मिळाली आणि मग मागे वळून पाहणे झालेच नाही. 'दरोडेखोर', 'अरे संसार संसार', 'शापित', 'आईचा गोंधळ' अशा अनेक सिनेमांमधल्या त्यांच्या भूमिका गाजल्या.. 'अश्रूंची झाली फुले', 'वीज म्हणाली धरतीला', 'पती माझे उचापती' अशी नाटकंही त्यांनी केली.

सिने आणि नाट्य सृष्टी गाजवतानाच छोट्या पडद्याची भुरळही त्यांना पडली. 'परमवीर', 'तू तू मै मै' या मालिकांतून पुन्हा एकदा ते घराघरांत पोचले. 'फू बाई फू'च्या ग्रँड फिनालेमधला त्यांचा परफॉर्मन्स हा दुदैर्वानं शेवटचा ठरला. रसिकांच्या मनात कायमच राहणार्‍या कुलदीप पवार यांना आयबीएन लोकमतची आदरांजली.

Loading...

कुलदीप पवार यांचा चित्रपटप्रवास

 • दरोडेखोर - 1980
 • अरे संसार संसार - 1981
 • शापित - 1982
 • मर्दानी -1983
 • गुपचुप गुपचुप - 1983
 • बिन कामाचा नवरा - 1984
 • आली लहर केला कहर - 1984
 • गोष्ट धमाल नाम्याची - 1984
 • आई तुळजाभवानी - 1986
 • सर्जा - 1987
 • दूध का कर्ज - 1990
 • जीत - 1996
 • वजीर - 1996
 • अरे देवा - 2007
 • गुलाबराव झावडे - 2010
 • आईचा गोंधळ
 • अशी ज्ञानेश्वरी
 • घात प्रतिघात
 • नवरा माझा नवसाचा
 • जावयाची जात

कुलदीप पवार यांची नाटकं

 • अश्रूंची झाली फुले
 • वीज म्हणाली धरतीला
 • पाखरू
 • रखेली
 • निष्कंलक
 • पती माझे उचापती

मालिका

 • परमवीर

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 24, 2014 11:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...