बेपत्ता मलेशियन विमान हिंदी महासागरात बुडालं

बेपत्ता मलेशियन विमान हिंदी महासागरात बुडालं

  • Share this:

news_malaysian_airline24 मार्च : 239 प्रवाशांना घेऊन उडालेलं विमान अचानक बेपत्ता होतं...त्या विमानाचं अपहरण झालं?, पायलटने विमान पळवलं ?, विमान तालिबान्यांनी अपहरण केलं?, विमान बेपत्ता होण्यामागे दहशतवाद्यांचा हात? अशा अनेक शंका, कुशंका वर्तवल्या गेल्यात पण अखेर ती दुर्देवी बातमी आता स्पष्ट झालीय.

मलेशियन एअरलाईन्सचं बेपत्ता विमान हिंदी महासागरात बुडालं आहे. विमानात असलेल्या सर्व 239 प्रवासी जिवंत राहण्याची शक्यता नाही त्यामुळे या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला असा अंतिम निष्कर्ष मलेशियाचे पंतप्रधान नजीब रज्जाक यांनी काढला आहे. याबद्दल त्यांनी घोषणा केली असून मृतांबद्दल दुख व्यक्त केलंय.

गेल्या 16 दिवसांपासून या विमानाचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. पण त्याचा थांगपत्ता मात्र अजून लागला नाही. विमानाचे अवशेष हिंदी महासागरात तरंगत असल्याच्या सॅटेलाईट इमेजेस आणि इलेक्ट्रॉनिक डेटा मिळाला. त्यावरून विमान हिंदी महासागरात बुडाल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय. 8 मार्च रोजी हे क्वालालंपूरवरून बीजिंगला जाणारं हे विमान रडारवरून गायब झालं होतं. या विमानात पाच भारतीय प्रवासी होते. त्यापैकी तीन जण मुंबईतले होते.

गेल्या सोळा दिवसांपासून भारत, चीनसह सह सव्वीस देशांचं नौदल आणि उपग्रह या विमानाचा शोध घेत आहे. त्यापैकी फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियाच्या उपग्रहांना हिंदी महासागरात या विमानाचे अपशेष सापडल्याची फोटो प्रसिद्ध करण्यात आले. तज्ज्ञांच्या माहितीनुसार चीनच्या समुद्रावरुन बिजींगच्या दिशेनं उडताना हे विमान अचानाक दिशा बदलून उलट्या दिशेने कोणामुळे उडवले गेले. या मागे मानवी हस्तक्षेप असल्या शिवाय हे होऊ शकत नाही असं स्पष्ट कयास वर्तवला जातोय. त्यानुसार चीनला जाणारे हे विमान दिशा बदलून हिंदी महासागरात कसं काय बुडालं याचं गूढ शोधण्याचं आव्हान आहे. या विमानात नेमकं काय घडलं हे विमानाचं ब्लॅकबॉक्स सापडल्यावरच कळेल.

 

First published: March 24, 2014, 8:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading