वेश्या व्यवसायास नकार देणार्‍या पीडितेवर चॉपरने केला वार

वेश्या व्यवसायास नकार देणार्‍या पीडितेवर चॉपरने केला वार

  • Share this:

177972323 मार्च :  शक्ती मिलमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा नुकताच निकाल लागून 4 नराधमांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. ही बातमी ऐकून महिला आत तरी सुरक्षित होतील आणि त्यांच्यावर होणार्‍या अत्याचारात घट होईल ही अशी आशा निर्माण होत अस्तानाचं भिवंडीमध्ये एका महिलेने वेश्या व्यवसाय करण्यास नकार दिल्याने तिला जबर मारहाण करण्यात आली आहे.

3 दिवसांपूर्वी पीडित महिलेला गुजरातवरुन आणून भिवंडीच्या रेड लाईट भागात विकण्यात आलं. या पीडित महिलेवर वेश्या व्यवसायासाठी जबरदस्ती करण्यात आली. मात्र पीडित महिलेने याला नकार दिल्यावर एक महिला, तिचा नवरा आणि मावसभाऊ या तिघांनी मिळून तिला लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. एवढंच नाही तर चॉपरने तिचे स्तन कापण्याचाही प्रयत्नही केला.

या अत्याचारामुळे पीडित महिला गंभीर जखमी झाली आहे. उपचारांसाठी तिला भिवंडीच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पीडीत महिलेची तब्येत अधिक बिघडल्यामुळे तिला आता ठाण्यातल्या सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या संदर्भात भिवंडीच्या कुंभारवाडा पोलिसा ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी महिलेला अटक केली असून तिच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2014 03:53 PM IST

ताज्या बातम्या