पहिल्या इनिंगमध्ये न्यूझीलंडचे 279 रन्स

पहिल्या इनिंगमध्ये न्यूझीलंडचे 279 रन्स

18 मार्च, हॅमिल्टन हॅमिल्टन टेस्टचा पहिला दिवस संपला. पहिला दिवस गाजवला तो भारतीय बॉलर्स, न्यूझीलंडचा कॅप्टन डॅनियल व्हिटोरी आणि रायडर यांनी. इनिंगच्या सुरुवातीला भारतीय फास्ट बॉलर्सनी अफलातून बॉलिंग केली. भारताच्या भेदक बॉलिंगपुढे न्यूझीलंडची टॉप बॅटिंग ऑर्डर पत्त्यासारखी कोसळली.अवघ्या 60 रन्समध्ये त्यांचे पहिले सहा बॅट्समन आऊट झाले.पण त्यानंतर कॅप्टन डॅनिएल व्हिटोरी आणि जेसी रायडर यांनी न्यूझीलंडचा डाव सांभाळला. सातव्या विकेटसाठी दोघांनी 184 रन्सची पार्टनरशिप केली.या पार्टनरशीपच्य जोरावर न्यूझीलंडने अडीचशे रन्सचा टप्पा पार केला. व्हिटोरीची ही तिसरी सेंच्युरी होती. पण सेंच्युरी झाल्यावर तो लगेचच आऊट झाला. जेसी रायडरही सेंच्युरी ठोकल्यावर पुढच्याच बॉलवर आऊट झाला आणि न्यूझीलंडची इनिंग आटोपली. भारतातर्फे ईशांत शर्माने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर मुनाफ पटेलने तिघांना आऊट केलं.त्यानंतर भारतानं पहिल्या दिवसाखेर 29 रन्स केले.

  • Share this:

First published: March 18, 2009, 7:08 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading