लोकलमध्ये महिलेची चाकू भोसकून हत्या

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2014 03:33 PM IST

Image img_194252_local_240x180.jpg22 मार्च : मुंबईत लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. विरार ते चर्चगेटदरम्यान लोकलमध्ये आज (शनिवारी) पहाटे 4 वाजता एका भाजी विक्रेत्या महिलेची चाकू भोसकून हत्या करण्यात आली.

पंगा जनिया अधेर असं या महिलेचं नाव आहे. नालासोपारा ते वसई दरम्यान अज्ञात व्यक्तीने या महिलेच्या पोटात तीन वेळा चाकू भोसकला. मोटरमन केबिनच्या मागे असलेल्या मालडब्यात ही घटना घडली.

या महिलेला त्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला. ही महिला सोपारा गावात राहणारी होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2014 02:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...