पाकला धूळ चारली, भारताची विजयी सलामी

पाकला धूळ चारली, भारताची विजयी सलामी

  • Share this:

t20_ind vs pak ind win21 मार्च : आशिया कपमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढत भारताने टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी दिलीय. पहिल्याच मॅचमध्ये भारतानं पाकिस्तानचा 7 विकेटनं दणदणीत पराभव केला आहे.

पहिली बॅटिंग करणार्‍या पाकिस्ताननं टीम इंडियासमोर विजयासाठी 131 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. सुरुवातीपासूनचं रोहित शर्मा आणि शिखर धवनने फटकेबाजी केली. रोहित शर्माने 24 तर शिखर धवनने 30 रन्स केले. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने सुरेश रैनाच्या साथीनं धुवाँधार फटकेबाजी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

कोहलीने 36 तर रैनानं 35 रन्स केले. या विजयाबरोबरच वर्ल्ड कपमधील पाकिस्तानवरील विजयाची परंपरा टीम इंडियाने कायम ठेवली आहे. भारतातर्फे दोन विकेट घेणारा अमित मिश्रा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला.

First published: March 21, 2014, 10:43 PM IST

ताज्या बातम्या