गारपीटग्रस्तांना ऑनलाईन मदत !

गारपीटग्रस्तांना ऑनलाईन मदत !

  • Share this:

hail storm victim help 21 मार्च : अस्मानी संकटामुळे बळीराजा पुरता हैराण झालाय. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं असून सोन्यासारखी पिकं जमीनदोस्त झालीय. या नुकसानीमुळे आतापर्यंत 29 शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपवलीय. गारपीटग्रस्तांसाठी सरकारने चार हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे.

पण समाजानंही आपली जबाबदारी उचलली पाहिजे, गारपीटग्रस्तांना मदतीचा हात दिला पाहिजे. शेतकर्‍यांचं नुकसान तर झालचं आहे, पण, भटक्या विमुक्त जमातीच्या घरांचं नुकसान झालंय. घरांसाठी निवारा हवाय. घरात अन्नधान्यही नाही.

पशुधनाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. अशावेळी तुमच्या माणुसकीला आवाज द्या...तुम्ही पुढील संस्थांना संपर्क साधून मदत करू शकता तसंच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेला ऑनलाईन बँकेद्वारे मदत करु शकता.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस

अकाऊंट नंबर : 0765104000038289

बँक : आयडीबीआय

बँकेचा पत्ता : आयडीबीआय बँक

देवनार शाखा

युनिट नंबर 1, सफल प्राईड

सायन ट्रॉम्बे रोड

देवनार, मुंबई 400088

IFS code: IBKL0000765

SWIFT Code: IBKLINBB126

Branch Code: 765

MICR: 400259090

चेक – ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ या नावानं द्यावा

 

2) ‘अफार्म’

द्वारा, सुभाष तांबोळी,

कार्यकारी संचालक,

2/23, A-B, रायसोनी पार्क, मार्केट यार्ड, पुणे – 411037

ई-मेल : admin@afarm.org

3) ‘लोकपर्याय’ (भारतीय लोक आणि पर्यावरण विकास संस्था)

त्रिवेणी, बँक ऑफ बडोदाच्या वरचा मजला, समर्थनगर, औरंगाबाद – 431001

4) मानवलोक, विद्यकुंज कॉलनी, पोस्ट बॉक्स नंबर 15, अंबेजोगाई, जिल्हा बीड – 431517

First published: March 21, 2014, 7:45 PM IST

ताज्या बातम्या