शक्ती मिल गँगरेप प्रकरणी: चारही नराधमांना मरेपर्यंत जन्मठेप

शक्ती मिल गँगरेप प्रकरणी: चारही नराधमांना मरेपर्यंत जन्मठेप

  • Share this:

shaktimill21 मार्च : महालक्ष्मी येथील शक्ती मिल परिसरात गेल्या वर्षी टेलिफोन ऑपरेटरवर झालेल्या सामूहिक बलात्कारातील चार आरोपींना सत्र न्यायालयाने आज (शुक्रवार) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर फोटोजर्नालिस्ट सामूहिक बलात्कार प्रकरणाचा सुनावणी 24 तारखेपर्यंत म्हणजेच सोमवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

मुंबईतल्या महालक्ष्मी इथली पडिक शक्ती मिल. तारीख : 22 ऑगस्ट 2013, वेळ संध्याकाळी 5: 20 ची. एका फोटोजर्नलिस्ट तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडल्यामुळे शहरात एकच खळबळ माजली होती. त्यातच भर म्हणजे याच ठिकाणी एका टेलिफोन ऑपरेटर मुलीवरही सामूहिक बलात्कार झाल्याचं नंतर उघड झालं. काल या दोन्ही प्रकरणात मुंबई सेशन्स कोर्टाने  5 आरोपींना कोर्टाने दोषी ठरवलं होत. यामधले विजय जाधव, मोहम्मह कासीम आणि मोहम्मद सलीम हे तीन आरोपी या दोन्ही घटनांमध्ये दोषी आहेत.

टेलिफोन ऑपरेटरसामूहिक बलात्कार प्रकरणी आरोपी विजय जाधव, मोहम्मद कासीम, अशफाक शेख व महम्मद अन्सारी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.  तर फोटोजर्नालिस्ट सामूहिक बलात्कार प्रकरणाचा सुनावणी 24 तारखेपर्यंत म्हणजेच सोमवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले. या खटल्यातील आरोपींना फाशी देण्याची मागणी त्यांनी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 21, 2014 01:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...