आंबिवलीजवळ लोकलचे डबे निखळले, 1 ठार

आंबिवलीजवळ लोकलचे डबे निखळले, 1 ठार

  • Share this:

mumbai local news420 मार्च : मध्य रेल्वेच्या टिटवाळा रेल्वे स्टेशनहून सीएसटीकडे जाणार्‍या लोकलचे चार डबे निखळले. आंबिवली स्टेशनजवळ ही घटना घडलीय. या अपघात 1 जणांचा मृत्यू झालाय तर 5 जण जखमी झाले आहे. आणखी काही प्रवाशी जखमी झाल्याचं वृत्त आहे.

कसाराहून सीएसटीकडे जाणारी ही लोकल होती. अडीच वाजेच्या सुमारास ही लोकल टिटवाळा स्टेशनवर पोहचली. टिटवाळा स्टेशनवरुन निघालेल्या या लोकलचे आंबिवली स्टेशनजवळ अचानक कपलिंग तुटल्यामुळे चार डब्बे मागच्या दिशेनं धावत मागे गेले. त्यामुळे जवळपास दीड किलोमीटर रेल्वे ट्रॅक उखडला गेलाय. लोकलचे चार डब्बे मागे धावत असल्यामुळे काही प्रवाशानी घाबरून रेल्वेतून उड्या टाकल्या. यात पाच जण जखमी झाले. तर अमोल लगदा (वय 18) या तरुणाचा मृत्यू झाला.

घटनास्थळी रेल्वेचं बचावपथक पोहचलं आहे. अपघात का घडला याचा तपास घेतला जात आहे. रेल्वे ट्रॅक उखडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झालीय. वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. पण या अपघातामुळे मुंबईकडे येणार्‍या लांब पल्ल्याच्या गाड्या मनमाड इथून दौंड, पुणे मार्गे वळवण्यात आल्या आहेत.मुंबईहून मनमाडकडे येणारी गोदावरी एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर उद्या मनमाडहून सुटणार्‍या गोदावरी आणि राज्यराणी एक्स्प्रेसही रद्द करण्यात आलीय. दरम्यान रेल्वेनं आता टिटवाळा ते कसारा शटल सेवा सुरू केलीये. तसंच केडीएमसीनं विशेष बसची व्यवस्था केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 20, 2014 05:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...