19 मार्च : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यात शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. सोन्यासारखी पिकं जमीनदोस्त झालीय. या नुकसानीमुळे आतापर्यंत 29 शेतकर्यांनी आपली जीवनयात्रा संपवलीय. गारपीटग्रस्तांसाठी सरकारने चार हजार कोटींचा प्रस्ताव मांडला आहे. निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर शेतकर्यांना ही मदत मिळेल.
पण समाजानंही आपली जबाबदारी उचलली पाहिजे, गारपीटग्रस्तांना मदतीचा हात दिला पाहिजे. शेतकर्यांचं नुकसान तर झालचं आहे, पण, भटक्या विमुक्त जमातीच्या घरांचं नुकसान झालंय. घरांसाठी निवारा हवाय. घरात अन्नधान्यही नाही. पशुधनाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. अशावेळी तुमच्या माणुसकीला आवाज द्या...तुम्ही पुढील संस्थांना संपर्क साधून मदत करू शकता.
1) TISS
द्वारा, जॅकलीन जोसेफ,
अध्यक्ष, जमशेटजी टाटा सेंटर फॉर डिझास्टर मॅनेजमेंट
देवनार, मुंबई- 400088
पोस्ट बॉक्स नंबर 8313
चेक - 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस' या नावानं द्यावा
2) 'अफार्म'
द्वारा, सुभाष तांबोळी,
कार्यकारी संचालक,
2/23, A-B, रायसोनी पार्क, मार्केट यार्ड, पुणे - 411037
ई-मेल : admin@afarm.org
3) 'लोकपर्याय' (भारतीय लोक आणि पर्यावरण विकास संस्था)
त्रिवेणी, बँक ऑफ बडोदाच्या वरचा मजला, समर्थनगर, औरंगाबाद - 431001
4) मानवलोक, विद्यकुंज कॉलनी, पोस्ट बॉक्स नंबर 15, अंबेजोगाई, जिल्हा बीड - 431517