कर्जमाफीचा निर्णय रिझर्व्ह बँकेशी चर्चा केल्यानंतरच -शरद पवार

कर्जमाफीचा निर्णय रिझर्व्ह बँकेशी चर्चा केल्यानंतरच -शरद पवार

  • Share this:

iv_sharad pawar19 मार्च : गारपीटग्रस्तांना महाराष्ट्र सरकारनं मदत का जाहीर केली नाही, हे मला माहीत नाही. संपूर्ण देशात रिझर्व्हे बँकेच्या गाईड लाईननुसारच निर्णय घेतले जाईल पण तातडीने निर्णय घेण्याचा मला अधिकार नाही. जरी सरकारला काही निर्णय घ्यायचा असेल तर तो निवडणूक आयोगाच्या परवानगीनेच घ्यावा लागेल अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मांडली.

तसंच गारपीटग्रस्त भागात लवकरच भरीव मदत दिली जाईल यासाठी आज बैठक बोलावली आहे असं आश्वासनही पवारांनी दिलं. आयबीएन लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतील शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवार मीडियावरही बरसले.

मध्यप्रदेशमध्ये कर्ज माफीची घोषणा करण्यात आली तशी महाराष्ट्रात का होत नाही ? असा सवाल विचारला असता शरद पवार म्हणाले की, याबद्दल तुम्हाला विचारायचं असेल तर महाराष्ट्रात जा, त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही असं तडक उत्तर शरद पवारांनी दिलं.मात्र यावर त्यानी खुलासाही केला. मध्यप्रदेशमध्ये पिककर्ज माफीची घोषणा केलेले नाही. शिवराज सिंह चौहान मला भेटले होते. त्यांनी त्याबद्दल निवेदनही दिलं आहे. पण त्यांनी मीडियाला काय माहिती दिली त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही. पण कर्ज माफीचा निर्णय हा रिझर्व्ह बँकेच्या गाईड लाईन्सप्रमाणे होते. पण मी काही बोललो ते मीडिया उचलून धरतंय.

खरी परिस्थिती अशी आहे की, संपूर्ण देशात रिझर्व्हे बँकेनं एक नियामावली बनवली आहे. त्यानुसारच निर्णय घ्यावे लागतात. त्यानुसार पिक कर्जातून मुक्त करण्यासाठी निर्णय घेता येत नाही. शेतकर्‍यांशी याबाबत चर्चा केली. आमच्या डोक्यावर जो कर्जाचा बोजा आहे. तो परत करू शकत नाही. आज आमची परफेडीची अवस्थता नसल्यामुळे आता तुम्ही वसुली बंद करा. जो काही बोजा आहे. त्यासाठी हफ्ते द्या, व्याजामध्ये सवलत द्या, जरी कर्ज थकलं तरी नवीन पिक घेण्यासाठी कर्ज पुरवठा करा अशा मागण्या शेतकरी सतत मांडत आहे. याच्यासंबंधीचा विचार हा निश्चित केला पाहिजे. यासाठी बैठक घेणार असून यावर तोडगा काढला जाईल असं आश्वासन शरद पवार यांनी दिलं.

तातडीने निर्णय घेण्याचा अधिकार नाही

यावर्षी रिझर्व्हे बँकेच्या गाईड लाईन्स नुसार गारपीटग्रस्त भागात कर्ज वसुली केली जाणार नाही का ? असा सवाल विचारला असता शरद पवार म्हणतात, रिझर्व्हे बँकेच्या गाईड लाईननुसारच निर्णय घेतले जाईल पण तातडीने निर्णय घेण्याचा मला अधिकार नाही. निवडणूक आयोगाने स्पष्ट कळवलं की, तुम्ही याबाबत बैठक घेऊ शकतात, चर्चा करू शकतात जोकाही निर्णय घ्यायचा आहे तो अगोदर आम्हाला कळवा आणि आमच्या संमतीनंतरच तुम्ही पुढची कारवाई करू शकतात असं पवारांनी स्पष्ट केलं.

शरद पवार मीडियावर बरसले

मीडियातील लोकांचं अज्ञान आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सरकारच्या कामामध्ये काही फरक नाही. दोन्ही सरकारने आम्हाला निवेदन दिलं आहे. काही राज्यांमध्ये नियामावलीनुसार अंमलबजावणी करता येते पण ती इतकी तुटपुंजी आहे की, त्यामुळे शेतकर्‍यांच्या अडचणी कमी होणार नाही. भरीव मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे. पण ज्यांना ग्राऊंड लेव्हलची परिस्थिती माहित नाही. ज्यांना शेतकर्‍यांची, पिकांची माहिती नाही त्यांना बोलण सोप आहे. "काय करतंय सरकार? 15 दिवस झाले मदत नाही ?" चॅनेलच्या पॅनलवर उगाच मोठमोठ्याने बोलून मतं मांडायची आणि लोकांमध्ये संमभ्र निर्माण करायचा हे योग्य नाही. आज शेतकर्‍यांच्या पाठीशी धीराने उभं राहण्याची गरज आहे असं मत पवारांनी मांडलं.

 कृपया आत्महत्या करू नका

सोन्या सारखं पिक हातातून गेलं त्यामुळे काही माणसांच्या मनावर परिणाम होतो. त्यामुळे काही लोकांनी आत्महत्या केल्यात. पण त्याच्या आत्महत्येनंतर त्याची शेती ही त्याच्या कुटुंबाची असते मग त्यांना अडचणी नसता का ? संकटं येत असता. त्याला धैर्यानं सामोरं जावं लागतं. याच्यावर मात कशी करायची यासाठी आत्मविश्वास वाढीसाठी काम करावं लागणार आहे. त्यामुळे कृपा करून आत्महत्या करू नका असं आवाहन शरद पवार यांनी शेतकर्‍यांना केलं.

First published: March 19, 2014, 6:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading