आज आणखी चार शेतकर्‍यांच्या आत्महत्या

आज आणखी चार शेतकर्‍यांच्या आत्महत्या

  • Share this:

234marathvada_farmar19 मार्च : राज्यात आजही गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. आज (मंगळवारी) सकाळपासून चार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलंय.

बीड जिल्ह्यातील आंबील वडगाव येथील उद्धव तांदळे या शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर तुळजापुरातही गारपिटीचा आणखी एक बळी गेलाय. श्रीराम देवकर या शेतकर्‍यानेही गळफास लावून आत्महत्या केली आहे.

तर जळगाव जिल्ह्यात अजून दोन शेतकर्‍यांनी विष पिऊन आत्महत्या केल्याचं समोर आलंय. जामनेर तालुक्यातील हिंगणे पिंपरी मधील रतन पाटील, तर पारोळा तालुक्यातल्या कानकरंज मधील मनोहर पाटील या दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे.

सरकारी मदत जाहीर न झाल्यामुळे राज्यभरातील शेतकर्‍यांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारलाय. मंगळवारपर्यंत संपूर्ण राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा आकडा 23 होता आता 27 वर गेला आहे.

First published: March 19, 2014, 3:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading