'त्या बेपत्ता विमानाने होऊ शकतो भारतावर हल्ला'

'त्या बेपत्ता विमानाने होऊ शकतो भारतावर हल्ला'

  • Share this:

malaysia crash16 मार्च :  बेपत्ता असलेल्या मलेशिया एअरलाईन्सच्या विमानाचा वापर करून अमेरिकेवर झालेल्या 9/11 दहशतवादी हल्ल्यासारखा भारतावर हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता अमेरिकेचे माजी उपविदेश मंत्री स्ट्रोब टाल्बोट यांनी व्यक्त केली आहे.

टाल्बोट यांनी ट्विटरवर अशा प्रकारची शंका व्यक्त करून खळबळ उडवून दिली आहे. 'मलेशिया एअरलाईन्सच्या एमएच 370 या विमानाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले आहे. या विमानाचा वापर भारतातील कोणत्याही मोठ्या शहरावर हल्ल्यासाठी वापर करण्यात येईल. या विमानाचे झालेले अपहरण आणि निर्माण झालेले रहस्य यावरून मला असे वाटत आहे.' असं टाल्बोट म्हणाले

८ मार्चपासून बेपत्ता असलेल्या मलेशियन एअरलाईन्सच्या MH-370 विमानाबद्दलचे गूढ आणखी वाढले आहे. हे विमान समुद्रात कोसळल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते. मात्र, आठवडाभर सर्व प्रकारे शोध घेतल्यानंतरही या विमानाचे साधे अवशेषही कुठे सापडले नाहीत.

दरम्यान, दहा देशांचं नौदल आणि हवाई दल या विमानाचा माग काढण्यात गुंतले आहे. भारतीय तुकडीने अंदमान निकोबार समुद्रात शोध मोहीम सुरु केली आहे. 227 प्रवासी व 12 कर्मचारी या विमानात आहेत.

First published: March 16, 2014, 12:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading