15मार्च : बहिणीनं प्रेमविवाह केल्याचा रागातून सख्या भावानेच आपल्या बहिणीला टॅक्टरखाली चिरडून तिची हत्या केली. अंगावर शहारे आणणारी ही घटना जळगाव जिल्ह्यातल्या हनुमंतखेडेसीम येथे घडली. एरंडोल तालुक्यात घडलेल्या या ऑनर किलिंगनं गाव स्तब्ध झालंय.
एरंडोल तालुक्यातील हनुमंतखेडे येथील कृष्णा शिवाजी मोरे (28) आणि वैशाली पुंडलिक पाटील (20) यांनी डिसेंबर 2012 मध्ये प्रेमविवाह केला. यासाठी आळंदी संस्थानमध्ये रीतसर नोंदणी केली होती. यानंतर जुलै 2013 मध्ये कृष्णा आणि वैशाली हनुमंतखेडेसीम येथे रहायला आले.
वैशाली मोरे ही मराठा समाजातील एका सधन घरातील तर कृष्णा हा कोळी समाजाचा हा साधा टॅक्टर चालक असल्याने वैशालीच्या नातेवाईकांना प्रथम पासूनच यांच्या लग्नाला विरोध होता. तरी घरचा विरोध पत्कारुन वैशाली हिने कृष्णाशी लग्न केल्याने तिचा लहान अल्पवयीन भावाच्या मनात प्रचंड राग होता. शुक्रवारी सकाळी 11 वाजता वैशाली पाटील आपल्या 1 महिन्यांच्या मुलीला आणि पुतणीला पोलिओ डोस पाजण्यासाठी घेऊन जात होती.
त्याचवेळी तिच्या भावाने ट्रॅक्टरने तिला अक्षरश: चिरडलं. ट्रॅक्टर मागे पुढे करुन.. दोन वेळा चिरडून तिची हत्या केली. त्यात तिची एक वर्षाची मुलगी दूर फेकली गेल्याने बचावली. बाळाला किरकोळ खरचटले असून तिला जळगाव जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल कऱण्यात आले आहे या घटनेने कृष्णा मोरे कुटुंबीय हे प्रचंड दडपणाखाली असल्याचे जाणवत होते. त्यांनी आपल्या जीवाला गावात भीती वाटत असून पोलीस बंदोबस्ताची मागणी केलीय. मारेकरी भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला ज्युवेनाईल कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा