पंतप्रधानांना भेटणार : राज्य सरकारचा निर्णय

पंतप्रधानांना भेटणार : राज्य सरकारचा निर्णय

  • Share this:

chavan14 मार्च : राज्यातल्या गारपीटग्रस्त भागातल्या शेतकर्‍यांना मदत देण्यासंबंधी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रीस्तरीय शिष्टमंडळ पंतप्रधान आणि मुख्य निवडणूक आयुक्तांची आज भेट घेणार आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मदत देताना सध्याच्या निकषांपेक्षा जास्त मदत देण्याचा निर्णय काल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ मंत्र्यांच्या झालेल्या मंत्रिमंडळाची विशेष बैठकीत घेण्यात आला. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. झालेले नुकसान पाहता, नेहमीच्या नुकसानाऐवजी हेक्टरी 25 हजार ते 50 हजार रुपये भरपाई देण्यात यावी अशी मागणी होते आहे.

पुण्यात कालही मुसळधार पाऊस पडला. दुपारीच विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. वाहतुकीवर याचा थोडा परिणाम झाला. तर नाशिक जिल्ह्यातल्या कोपरगावमध्ये गारपीट झाली. मालेगाव आणि उमरणा या तालुक्यांमध्येही जोरदार पाऊस झाला. तर बीड जिल्ह्यातल्या मौजवाडीमध्ये वीज पडून एका तरुण शेतकर्‍याचा मृत्यू झाला.

तर दुसरीकडे अर्धवट पंचनामे आणि अपूर्ण नोंदी ही सरकारी कर्मचार्‍यांची हालगर्जी उत्तर महाराष्ट्रातल्या दौर्‍यात उघड झाली. गारपिट आणि अवकळी पावसाच्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकातल्या काही सदस्यांनी काल धुळे जिल्ह्याचा दौरा केला. शेतात आडवा पडलेला गहू, मोड आलेलं पीक, उद्‌ध्वस्त झालेल्या लिंबाच्या आणि केळीच्या बागा शेतकर्‍यांनी अधिकार्‍यांना दाखवल्या. यावेळी नुकसानीचे पंचनामे आणि अहवाल अपूर्ण राहात असल्याचं समितीच्या अधिकार्‍यांच्यात निदर्शनास आलं. संबंधित अधिकार्‍यांकडे त्यांनी तशी विचारणाही केली. मात्र, अधिकारी त्यांवर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत.

दरम्यान, महाराष्ट्रातले सरकारी कर्मचारी गारपीटग्रस्तांच्या मदतीला धावून आलेत. 15 लाख अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्र्यांना देण्याचा निर्णय घेतलाय. ही मदत 200 कोटी रुपयांची असणार आहे. या बाबतचं निवेदन मुख्यमंत्र्याना दिलंय, अशी माहिती महारष्ट्र राज्य राजपत्रीत अधिकारी महासंघाचे मुख्यसल्लागार ग. दी. कुलथे यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 14, 2014 10:43 AM IST

ताज्या बातम्या