मुंबई रॅली: केजरीवालांविरोधात FIR दाखल

मुंबई रॅली: केजरीवालांविरोधात FIR दाखल

  • Share this:

मुंबई रॅली: केजरीवालांविरोधात FIR दाखल

13 मार्च : मुंबईतील रॅली प्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात एअरपोर्ट पोलिसांनी एफआयआर दाखल केलाय. बुधवारी मुंबई विमानतळावर आगमन झाल्यानंतर आपच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.

त्यामुळे जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन झालं तसंच सरकारनं दिलेले वाहन न वापरल्यामुळे त्यांच्या विरोधात हा एफआयर दाखल करण्यात आला आहे. कलम 188, 141 ते 143 भा.द.वि. आणि महाराष्ट्र पोलीस कायदा 21 (20) सह 177 मोटारवाहन कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आलीय.

मात्र माझं रिक्षातून जाणं प्रतीकात्मक नव्हतं. मी एरव्हीही जातो. बुधवारीच्या गोंधळासाठी मीडियाच जबाबदार होती, आपचे कार्यकर्ते नव्हते, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. केजरीवाल यांनी आयबीएन लोकमतला विशेष मुलाखती दिली यावेळी ते बोलत होते.

First published: March 13, 2014, 7:14 PM IST

ताज्या बातम्या