लातूरच्या जागेसाठी काँग्रेसचा उमेदवार कोण?

  • Share this:

Image img_191772_congresspartymumbi_240x180.jpg13 मार्च : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगतनेते विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर लातूरमध्ये पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक होतीय. त्यामुळेच लातूरच्या जागेसाठी काँग्रेसचा उमेदवार कोण याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. विलासरावांच्या लोकप्रियतेमुळे गेल्या निवडणुकीपर्यंत उमेदवाराची काळजी कार्यकर्त्यांना वाटली नाही. मात्र यावेळी ताकदीचा स्थानिक उमेदवार देण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.

7 मार्चला इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात आले होते. त्यावेळी दत्तात्रय बनसोडे, लक्ष्मण कांबळे, सुनीता अरळीकर, मोहन माने यांच्यासह 15 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 7 जण काँग्रेसच्या उमेदवारीसाठी पात्र ठरलेत.

मात्र लोकसभेसाठी या 7 जणांपैकी कोण उमेदवार असावा याबाबत काँग्रेसभवनात आज मतदान होणार आहे. लातूरसाठी चर्चेत असलेल्या जयवंतराव आवळे आणि नरेंद्र जाधव या दोघांनीही अद्याप अर्ज केलेला नाही. मात्र ऐनवेळी काँग्रेसची लातूरची उमेदवारी कोणाला मिळणार याविषयी अंदाज बांधणं अवघड आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 13, 2014 12:21 PM IST

ताज्या बातम्या