News18 Lokmat

राजू शेट्टी वि.रघुनाथदादा पाटील तर सुप्रिया सुळे वि. खोपडे रिंगणात

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 12, 2014 08:00 PM IST

Image img_222292_raghunnathdadapatil_240x180.jpg12 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने आपली पाचवी यादी जाहीर केलीय. 'आप'ने महाराष्ट्रातल्या 17 उमेदवारांची नावं जाहीर केलीय.

बारामतीमधून राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुरेश खोपडे यांना उमेदवारी देण्यात आली तर हातकणंगलेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याविरोधात शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी उमेदवारी दिली आहे.

माढामधून सविता शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलीय तर उत्तर मुंबईमधून सतीश जैन यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे राष्ट्रवादी आणि महायुतीच्या बालेकिल्ल्यात आपने उमेदवार उभे केल्यामुळे मोठी लढत पाहण्यास मिळणार आहे.

Loading...

अशी आहे 'आप'ची पाचवी यादी

 

 • - बारामती - सुरेश खोपडे
 • - बुलडाणा - सुधीर सुर्वे    
 • - भिवंडी - जलालउद्दीन अन्सार
 • - हातकणंगले - रघुनाथ पाटील
 • - उत्तर मुंबई - सतीश जैन
 • - माढा - सविता शिंदे
 • - धुळे - निहाल अन्सारी
 • - नांदेड - नरेंद्रसिंग ग्रंथी    
 • - परभणी - सलमा कुलकर्णी    
 • - उस्मानाबाद - विक्रम साळवे
 • - रायगड - संजय अपरांती
 • - रामटेक - प्रताप गोस्वामी
 • - रत्नागिरी - कर्नल गडकरी
 • - सातारा - राजेंद्र चोरगे
 • - शिर्डी - नितीन उदमाले
 • - शिरुर - न्या. निकम
 • - कल्याण - नरेश ठाकूर    

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 12, 2014 08:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...