मुंबई, 05 ऑक्टोबर : टीव्हीवरील सर्वाधिक वादग्रस्त शो 'बिग बॉस 13' सध्या खूप चर्चेत आहे. या शोमध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे वाद आणि भांडणं पाहायला मिळत आहेत. तर काही स्पर्धक त्यांच्या आयुष्यातील अनुभव एकमेकांशी शेअर करताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या या शोमध्ये अनेक आश्चर्यकारक खुलासे होत आहेत. मागच्या वेळी सपना चौधरीनं तिच्या आयुष्याती खळबळजनक खुलासे करत सर्वांना हैराण केलं होतं. तर आता या सीझनमध्ये अभिनेत्री कोएना मित्रानंही तिच्या आयुष्यातील एका धक्कादायक खुलासा केला आहे. तिनं तिच्या एक्स बॉयफ्रेंड बद्दल जे काही सांगितलं ते ऐकून सर्वांनाच धक्का बसेल.
बॉलिवूड अभिनेत्री कोएना मित्रानं नुकत्याच बिग बॉसच्या घरात पार पडलेल्या अजब टास्कमध्ये खूप चांगलं प्रदर्शन केलं. त्यामुळे सोशल मीडियावर कोएनाचं खूप कौतुक केलं जात आहे. तिच्या या परफॉर्मन्समुळे ती सर्वांची लाडकी स्पर्धक झाली आहे. तिच्या परफॉर्मन्सवरुन ती एका खंबीर महिला असल्याचं स्पष्ट झालं. अशातच खासगी जीवनाविषयी अतिशय धक्कादायक खुलासा करून कोएना सगळीकडे चर्चेत आली आहे.
VIDEO : शूटिंग दरम्यान हारनेसवर बेशुद्ध झाला कॉमेडियन, अक्षय कुमारनं वाचवला जीव
पाचव्या दिवशी कोएना बिग बॉस हाउसमध्ये दलजीत कौर, माहिरा शर्मा, सिद्धार्थ डे यांच्यासोबत गप्पा मारत होती. दरम्यानं तिनं तिचा बॉयफ्रेंड आणि एका खतरनाक रिलेशनशिपविषयी सांगितलं. तिनं सांगितलं की तिचा एक्स बॉयफ्रेंड खूपच पॉजेसिव्ह होता. तो एक तुर्की होता आणि त्यानं एक दिवस तिला मुंबईतील तिच्या घराच्या बाथरुममध्ये बंद केलं होतं.
Navratri 2019 : गरबा फेम फाल्गुनी पाठकच्या गाण्यांवर थिरकली देसी गर्ल प्रियांका
कोएना पुढे म्हणाली, तो मला सतत धमकी देत असे की तो माझ्याशी लग्न करुन माझा पासपोर्ट जळवून टाकेल आणि तुर्कीला निघून जाईल. त्याच्याशी ब्रेकअप केल्यानंतर मी अशा अवस्थेत होते की, त्यानंतर 3 वर्ष मी कोणालाच डेट करण्याचा विचारही केला नाही.
बॉलिवूडमध्ये बोल्ड प्रतिमा तयार करणारी कोएना 'अपना सपना मनी मनी' या सिनेमानंतर मोठ्या पडद्यावरून गायब झाली होती. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री असण्यासोबतच कोएना एक सुपर मॉडेल सुद्धा आहे. एकेकाळी ती बॉलिवूडमधील बेस्ट आयटम गर्ल म्हणून ओळखली जात असे. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात ती काय कमाल करते याविषयी सर्वांना खूपच उत्सुकता आहे.
बिग बी म्हणाले, माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहा, महिला स्पर्धकाची झाली अशी अवस्था
===============================================================
VIDEO: आरेतील झाडांवर रात्री कुऱ्हाड; 700 झाडं परत द्या! आंदोलकांचा आक्रमक पवित्रा