जादूटोण्याच्या संशयावरून एकाची निर्घृण हत्या

जादूटोण्याच्या संशयावरून एकाची निर्घृण हत्या

  • Share this:

gaondiya jadutona10 मार्च : जादूटोण्याच्या संशयावरून लाठ्या-काठ्यांनी मारहाण करुन एकाची हत्या केल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात घडली. ह्या घटनेत प्रकाश पारधी नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर त्याचे वडील आणि बायको मारहाणीत गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. ह्या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

गोंदिया जिल्ह्यातील खामखुरा गावात उत्तम दुनेगार नावाच्या व्यक्तीचा चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. उत्तम वर जादूटोणा करून त्याला मारण्यात आल्याची शंका त्याच्या कुटुंबीयांना होती. त्यांच्या मृत्यूचा प्रकाश पारधीवर त्याच्या कुटुंबीयांचा संशय होता.

प्रकाश पारधी व त्याचं कुटुंब शेती करुन आपला उदारनिर्वाह भागवतात. मात्र रविवारी संध्याकाळी त्याचे चुलत मामा व इतर नातेवाईकांनी प्रकाशच्या घरावर हल्ला चढवत त्यांना गावातील वडाच्या झाडाजवळ नेऊन लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. ही मारहाण इतकी जबर होती की, त्यात प्रकाशचा मृत्यू झाला, तर त्याची बायको वंदना व वयोवृद्ध वडील गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चार जणांना अटक करून त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. जखमींवर गोंदिया येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे. ह्या घटनेत एकाच कुटुंबातील भाऊराव,नरेश , सुरेश व बळीराम दुनेदार पोलिसांच्या ताब्यात आहे.

First published: March 10, 2014, 3:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading