Elec-widget

पंचनामा झाल्याशिवाय मदत करता येणार नाही - शरद पवार

  • Share this:

sharad pawar4410  मार्च : राज्यात गेल्या आठवड्याभरात जोरदार वादळी पाऊस आणि गारपीट सुरू  त्यामुळे हजारो हेक्टरवर उभ्या पिकांचं आणि फळबागांचं नुकसान झालं आहे. पण या शेतकर्‍यांना मदत मिळायला उशीर होणार, हे आता स्पष्ट झालं आहे.

जोपर्यंत नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल येत नाही तोपर्यंत मदत देता येणार नाही असं वक्तव्य केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केलं आहे.शरद पवारांनी बीडमधल्या गारपिटग्रस्त भागाची पाहणी केली तेव्हा त्यांनी हतबलता व्यक्त केली.

शरद पवारांनी परळी तालुक्यातल्या मांडवा गावाला भेट दिली. या गावातल्या कांद्याचं मोठं नुकसान झालेल्या फड दाम्पत्याला शरद पवारांनी भेट दिली.

गेल्या 8 दिवसापासून मराठवाड्याला अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपून काढलं आहे. काल त्यांनी परभणी जिल्ह्यातील गारपीटग्रस्त भागांना भेट दिली. तिथिल परिस्थीतीची माहिती घेत तिथल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची विचारपूस केली. एकंदरीत किती भाग नुकसानग्रस्त झालाय ह्याचा आढावा त्यांनी घेतला. आज शरद पवार बीड जिल्हयातील गारपीटग्रस्त भागाचा दौरा करतायत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 10, 2014 02:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com