पुन्हा अपघात ; 'INS कोलकाता'वर गॅसगळती, 1 ठार

पुन्हा अपघात ; 'INS कोलकाता'वर गॅसगळती, 1 ठार

  • Share this:

INS KOL 307 मार्च :सिंधुरत्न पानबुडी अपघात प्रकरणाला काही दिवस उलटत नाही तोच आणखी एका नौदलाच्या जहाजावर अपघात झालाय. माझगाव डॉकमध्ये आयएनएस कोलकाता या विनाशिकेवर गॅसगळती झाली असून यात एका अधिकार्‍यांचा मृत्यू झालाय. तर 4 ते 5 कर्मचारी जखमी झाले आहे. जखमींना नौदलाच्या अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

नौदलात कोणतीही विनाशिका येण्याअगोदर तिच्या चाचणी घेतल्या जातात. यासाठी माझगाव डॉकमध्ये आयएनएस कोलकाता वर्गातील विनाशिकेचं बांधकाम सुरू असताना अपघात घडलाय विनाशिकेवरील गॅस टॅकमध्ये गळती झाल्यामुळे स्फोट झाला . यात एका अधिकार्‍याचा मृत्यू झालाय.

दोन आठवड्यांपुर्वीत सिंधुरत्न पाणबुडीत आग लागल्यामुळे दोन जवानांना आपला जीव गमवावा लागलाय या प्रकरणी नौदलप्रमुख डी.के.जोशी यांनी राजीनामा दिला होता. त्या अगोदर सिंधुरक्षक पाणबुडीला अपघात झाल्यामुळे 18 जवानांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणानंतर अपघाताचे सत्र सुरूच आहे.

 

First published: March 7, 2014, 5:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading