संघाच्या लोकांनीच महात्मा गांधींना मारलं -राहुल गांधी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 6, 2014 11:12 PM IST

संघाच्या लोकांनीच महात्मा गांधींना मारलं -राहुल गांधी

sdg475 rahul06 मार्च : संघाच्याच लोकांनी महात्मा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केली आणि आज भाजपचीच लोकं महात्मा गांधी बद्दल बोलत आहे असा थेट आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल यांनी केला.

हाच मुद्दा पुढं करत राहुल यांनी नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता टीका केली. सरदार वल्लभभाई पटेल हे काँग्रेसचे नेते होते. त्यांनी राष्ट्रीय स्वंय संघाबद्दल विरोधात भूमिका मांडली होती. पण आज मोदी म्हणतात पटेल आमचे नेते आहे.

संघाने पटेल यांना विरोध केला, महात्मा गांधींना विरोध केला पण आता मतांसाठी सर्व नेते आमचे आहेत असं ढोंग करतात अशी घणाघाती टीकाही राहुल यांनी केली. राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहे. आज (गुरुवारी) त्यांची भिवंडीत सभा पार पडली यावेळी ते बोलत होते.

अशोक चव्हाणांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं 'नो कमेंट'

दरम्यान, भिवंडीला जाण्याआधी राहुल गांधींनी सकाळी गिरगावमध्ये ठक्कर हॉलमध्ये संपादकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका केली नाही. पण, मोदी आणि भाजपच्या विचारसरणीवर त्यांनी जोरदार टीका केली. मात्र, यावेळी त्यांनी अशोक चव्हाणांबाबतचा प्रश्न टाळला. अशोक चव्हाण बुधवारी औरंगाबादमधल्या सभेत राहुल गांधींच्या स्टेजवर उपस्थित होते. राहुल गांधींनी भ्रष्टाचारावरून भाजपला लक्ष्य केलं. पण आदर्श प्रकरणाचा त्यांना विसर पडला का, असा प्रश्न विचारला गेला. पण त्यावर मात्र राहुल गांधींनी उत्तर दिलं नाही.

Loading...

कोळी बांधवांशी संवाद

तर दुसरीकडे राहुल गांधींनी मुंबईच्या वेसावे गावातील बाजार मैदानात 550 कोळी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी कोळी बांधवांनी त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या. यावेळी राहुल यांनी कोळी समाजातून कोणी आमदार, खासदार का नाहीत असा प्रश्न विचारला. कोळा बांधवांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. मॅनग्रोव्जची जागा बिल्डरांना देणं, कोळीवाड्यांना जास्त एफएसआय देणे ह्या मुद्द्यांवरही या भेटीत चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि खासदार गुरुदास कामत हजर होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 6, 2014 07:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...