फ्रायडे रिलीज

फ्रायडे रिलीज

12 मार्चया वीकेन्डला भरपूर सिनेमांचा चॉइस आहे. हिंदी, मराठी, हॉलिवूडचे सिनेमे पहायला मिळणार आहेत.मेड इन चायना हा मराठी सिनेमा रिलीज होत आहे. संतोष कोल्हे यांचं दिग्दर्शन आणि निर्मिती असलेला हा सिनेमा सेझ विषयावर आहे. सेझमुळे अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी धोक्यात आल्यात. हाच संवेदनशील विषय दिग्दर्शकानं हाताळलाय. संदीप कुलकर्णी, मिलिंद गुणाजी, मधुरा वेलणकर, मृणाल कुलकर्णी, शिल्पा नवलकर अशी तगडी स्टारकास्ट सिनेमात आहे. या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या बर्‍याच अपेक्षा आहेत.बॉलिवूड सिनेमांमध्ये अनुराग कश्यपचा गुलाल रिलीज होतोय. एका कॉलेज स्टुडन्टची ही कथा आहे. जयपूरला शिकायला आलेल्या दिलीपला अनेक जण भेटतात. त्यांचा प्रभाव त्याच्यावर पडतो. या सिनेमात प्रेम, राजकारण सगळं आहे. गुलालामागचे खरे चेहरे दिग्दर्शकानं दाखवलेत. .के के मेनन, पियुष मिश्रा, आयेषा मोहन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.जय-विरू म्हटलं की आठवतो तो शोले सिनेमा. पण हे नाव आहे या आठवड्यातल्या हिंदी सिनेमाचं. फरदीन खान, कुणाल खेमू आणि अरबाझ खान यांच्या भूमिका आहेत. दोन मित्रांच्या जीवावर उठलेला डॉन अशी या विनोदी सिनेमाची कथा आहे.हॉलिवूडमध्ये ग्रॅन टोरिनो हा सिनेमा रिलीज होतोय. याला क्लिंट इस्टवूडचं दिग्दर्शन आहे. वॅल्ट कोवाल्स्कीच्या नजरेतून हा सिनेमा पहायला मिळतो. त्याचं ग्रॅन टोरिनो हे ऍवॉर्ड त्याच्या शेजारचीच मुलगी चोरणार असते, अशी सिनेमाची वन लाइन आहे. मुख्य भूमिकेत स्वत: दिग्दर्शक आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 12, 2009 02:40 PM IST

ताज्या बातम्या