महाराष्ट्रात तीन टप्प्यात होणार मतदान

महाराष्ट्रात तीन टप्प्यात होणार मतदान

  • Share this:

maharashtra election05 मार्च :  16व्या लोकसभा निवडणुकींच्या तारखां आज बुधवारी जाहिर करण्यात आल्या असून, महाराष्ट्रात तीन टप्प्यांत मतदान घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रात एकूण 48 जागांसाठी 10, 17, 24 एप्रिलला तीन टप्प्यात मतदान होणार आहे.

मुख्य निवडणुक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी आज सकाळी 10.30 वाजता निवडणुकांच्या तारखा जाहिर केल्या. देशभरात एकूण 9 टप्प्यांत मतदान होणार आसून 16मेला मतमोजणी हेणार आहे.

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात म्हणजेच 10 एप्रिलला विदर्भाच्या 10 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. तर दुसर्‍या टप्प्यात म्हणजे 17 एप्रिलला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या 19 मतदारसंघांमध्ये मतदान होईलतर तिसर्‍या टप्प्या म्हणजेच24 एप्रिलला उत्तर महाराष्ट्रसह मुंबईमधल्या 19 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.

महाराष्ट्रात...-

  • 10 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम
  • 17 एप्रिल - हिंगोली, नांदेड, परभणी, मावळ, पुणे, बारामती, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
  • 24 एप्रिल - नंदूरबार, धुळे, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईचे सर्व 6 मतदारसंघ, रायगड

 

First published: March 5, 2014, 1:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading